इस्लामपूरमधील तब्बल १२०० कोटींची उलाढाल ठप्प

2 crore turnover stop islampur corona virus
2 crore turnover stop islampur corona virus
Updated on

इस्लामपूर (सांगली) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर येथील औद्योगिक वसाहतीमधील सुमारे १२०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. या व्यवसायांमध्ये कार्यरत असलेल्या बहुतांशी कामगारांवर उपासमारीची म्हणता येणार नाही. परंतु आर्थिकदृष्ट्या वाईट वेळ येण्याची शक्यता आहे. यातील मोठ्या प्रमाणात उलाढाल असलेल्या संस्था वगळता सर्वसाधारण, मध्यम आणि लघु उद्योजकांचे काय होणार हा मोठा प्रश्न आहे. 

इस्लामपूर हे वाळवा तालुक्याचे महत्त्वाचे केंद्र आहे. तालुक्याला नाव वाळवा असले तरी तालुक्याचे मुख्य केंद्र इस्लामपूर हेच राहिले आहे. आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या या शहराने महाराष्ट्रात आपली वेगळी छाप पाडली आहे. सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूरने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले. जिल्ह्यात आणि तेही एका शहरात कोरोनाचे सुमारे २६ रुग्ण आढळले आहेत. सुदैवाने हे एकाच कुटुंबाशी संबंधित असल्याने अद्याप म्हणावा तसा धोका वाढला नाही, परंतु अद्यापही शहरात धाकधूक कायम आहे. कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढले तसे भय शहर आणि परिसरात वाढले. सर्व उद्योग बंद आहेत. केंद्र आणि राज्य सरकारनेदेखील लॉकडाऊन पुकारल्याने इस्लामपूर शहराशी संबंधित बसलेली औद्योगिक वसाहत ठप्प आहे. अत्यावश्यक समजले जाणारे उद्योग वगळता सर्व बंद आहेत. एकट्या इस्लामपूर औद्योगिक वसाहतीत जवळपास १५० हून अधिक उद्योग आहेत. त्यामध्ये सुमारे १२०० ते १३०० कर्मचारी काम करतात. त्यात कायमस्वरूपी कामगार जवळपास ९०० च्यावर आहेत. उर्वरित ३०० ते ४०० कामगार हंगामी आहेत. सरकारने २१ दिवसाचा लॉकडाऊन घोषित केल्याने यातील बहुतांश कामगारांना घरी बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सुमारे १२०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामगारांना या काळातील पगार देण्याची विनंती केली असली तरी ती कितपत पाळली जाईल, हे सांगता येत नाही. सर्वच उद्योगांना हे परवडणारे आहे अशातला भाग नाही. साखर कारखाने, दूध संघ व औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांना ते शक्य आहे, मात्र हा लॉकडाऊनचा काळ किती दिवसांचा असेल हेही निश्चित नसल्याने या संस्था तरी किती दिवस कामगारांना काम न करता वेतन देतील याबाबत शंका आहे. व्यावसायिक उलाढाल ८० ते ९० टक्के बंद असल्याने त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होणार हे निश्चित. यात लघुउद्योग बंद राहिल्याने बसणारा फटका खूपच मोठा असेल. शिवाय आता उद्योग सुरू झाले तरी किती लोक लवकर कामावर येतील याचीही शंका आहे.

इस्लामपूर औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांमध्ये दरमहा वेतनावर होणारा खर्च हा सुमारे २ ते अडीच कोटी रुपयांच्या घरातील आहे. ही रक्कम फारतर महिनाभर सोसली जाऊ शकते, पण पुढचे काय? हा गंभीर प्रश्न आहे. जे मोठे युनिट आहेत ते दोन महिने सोसू शकतील; पण त्यांनाही पुढे कामगारांचे दिवस भरून घ्यावे लागणार. प्रश्न आहे तो छोट्या उद्योजकांचा. या सर्व परिणामांची दखल घेतली जाणार असल्याचे संकेत केंद्र सरकारने दिले असले तरी अद्याप अधिकृत घोषणा नसल्याने उद्योजकांच्यात संभ्रमाचे वातावरण आहे.

"कोरोना व्हायरसमुळे बंद राहून अडचणीत आलेल्या उद्योजकांना सरकारने मदत करणे आवश्यक आहे. अनेकांची कर्जे आहेत ते हप्ते कुठून भरणार? मार्च अखेरबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कामगारांच्या पीएफच्या रक्कम कुठून भरणार? इंडस्ट्री जिवंत राहण्यासाठी सरकारने मदत करावी कशात तरी सवलत द्यावी, जेणेकरून उद्योजक कामगारांना वेतनाच्या रूपाने मदत करतील. लघुउद्योजकांना सरकारने स्वतंत्र पॅकेज जाहीर करून दिलासा देण्याची गरज आहे."

सर्जेराव यादव, अध्यक्ष, इस्लामपूर चेंबर ऑफ कॉमर्स.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com